View this information in English
या स्तरात संस्कृत व्याकरणाच्या संकल्पना मराठी किंवा इंग्रजीमध्ये समजावून शिकवल्या जातात. विद्यार्थ्यांनी ‘भाषाङ्कुरः’ या पाठ्यपुस्तकाचा संदर्भ घ्यावा. हा स्तर त्या जिज्ञासूंसाठी खुला आहे ज्यांना मराठी किंवा इंग्रजी समजते (कमीत कमी वय १३ वर्षे आवश्यक आहे). विद्यार्थी मराठी, इंग्रजी, हिंदी किंवा संस्कृतमध्ये संवाद साधू शकतात.
या स्तराचे फलित म्हणजे विद्यार्थ्यांनी व्याकरणाच्या मूलभूत संकल्पनांमध्ये प्रावीण्य मिळवणे, ‘सन्धि’च्या नियमांद्वारे पदे वेगळी करणे आणि काही प्रमाणात शब्दरूपे ओळखणे.
ग्रंथाबद्दल अधिक माहितीसाठी भेट द्या – https://sanskritseva.org/initiatives/bhashankura/
शिकण्याची पद्धत
विद्यार्थ्यांनी ठरवलेल्या क्रमाने ‘भाषाङ्कुरः’ समजून घेणे आवश्यक आहे :
- पायरी १ : ग्रहणम् – प्रत्येक आठवड्यात ३-४ धडे वाचून समजून घ्यावेत. अशा प्रकारे १६-१८ आठवड्यांत ६४ धडे पूर्ण करावेत.
- पायरी २ : चिन्तनम् – वाचलेल्या धड्यावर इतर विद्यार्थ्यांबरोबर चिंतन करावे.
- पायरी ३ : स्वाध्यायः – चिंतन केलेल्या धड्याचे स्वाध्याय स्वतः सोडवावेत आणि आपापसात तपासावेत.
- पायरी ४ : अनुवादः परीक्षणं च – ऑनलाईन वर्गात संस्थेचे अध्यापक शिकणाऱ्यांच्या शंका सोडवतात आणि आठवड्यात पूर्ण केलेल्या धड्यांविषयी सखोल प्रश्न विचारतात.
विद्यार्थ्यांनी वरीलप्रमाणे सांगितलेल्या शिकण्याच्या चार टप्प्यांचा निष्ठेने आणि नियमितपणे अभ्यास करणे अपेक्षित आहे.
३३ परीक्षांद्वारे अभ्यास तपासणे
- साप्ताहिक चाचण्या (पायरी ४ पाहा) – प्रत्येक आठवड्यातील शिकवणुकीच्या आधारे, अंदाजे २० साप्ताहिक चाचण्या होतील.
- चित्रांच्या आधारे चाचण्या – या चाचण्या विशिष्ट भाग पूर्ण झाल्यावर घेतल्या जातील आणि धड्यांच्या चित्रांवर आधारित असतील. अशा प्रकारच्या एकूण ११ चाचण्या असतील, दर महिन्याला दोन चाचण्या.
- मध्य टप्पा – २९ धडे पूर्ण केल्यावर (सुमारे ८ आठवड्यांनंतर), १०० गुणांच्या दोन ऑनलाइन परीक्षा घेतल्या जातील – ५० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि ५० गुणांची तोंडी परीक्षा. ही परीक्षा फक्त स्वमूल्यांकनासाठी आहे; अंतिम परीक्षणासाठी ती विचारात घेतली जाणार नाही.
- अंतिम परीक्षा – सर्व ६४ धडे पूर्ण केल्यावर (सुमारे २० आठवड्यांनंतर), अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी ४ आठवड्यांचा वेळ दिला जाईल. सहाव्या महिन्याच्या शेवटी, २०० गुणांची अंतिम परीक्षा घेण्यात येईल – १०० गुणांचे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि १०० गुणांची तोंडी परीक्षा.
उत्तीर्ण होण्यासाठी विद्यार्थ्यांनी लेखी आणि तोंडी या दोन्ही परीक्षांमध्ये किमान ७० गुण मिळवणे आवश्यक आहे. यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्र आणि आर्थिक पारितोषिक प्रदान करण्यात येईल.
भाषाङ्कुरविद्
लेखी आणि मौखिक या दोन्ही परीक्षांमध्ये ९० किंवा त्याहून अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी ‘भाषाङ्कुरविद्’ पुरस्कारासाठी पात्र ठरतील. त्यांना ‘भाषाङ्कुरविद्’ ही उपाधी असलेले ताम्रपत्र दिले जाईल. २५ वर्षे पूर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना विशेष आर्थिक पारितोषिक दिले जाईल. प्रत्येक विद्यार्थ्याला या गौरवासाठी पात्र ठरण्यासाठी जास्तीत जास्त दोन संधी मिळतील.
एका तुकडीमध्ये कमाल ३० विद्यार्थी असतील
टीप: स्तर १ची परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी स्तर २साठी पात्र होईल.
अभ्यासक्रमासाठी आवश्यक पूर्वतयारी
- अखंड इंटरनेट सुविधा
- ऑनलाइन चर्चांमध्ये सहभागी होण्यासाठी योग्य उपकरण (लॅपटॉप, टॅबलेट किंवा स्मार्टफोन)
- वयाची पुष्टी करणारे वैध ओळखपत्र (आधारकार्ड किंवा पासपोर्ट)
नोंदणी कशी करावी
- नोंदणीसाठी गूगल-फॉर्म WhatsApp क्रमांकावर पाठवला जाईल. तो 26 जुलै २०२५ पर्यंत भरून सादर करणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांची नोंदणी 27 जुलै २०२५ रोजी निश्चित केली जाईल.
- नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांची एक ऑनलाईन बैठक 27 जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वा. (भारतीय वेळेनुसार) घेण्यात येईल.
शुल्काबाबत माहिती
कोणतेही शिकवणी शुल्क अपेक्षित नाही. मात्र, खालील मुद्द्यांचा विचार करून इच्छुकांनी स्वेच्छेने देणगी देणे अपेक्षित आहे :
- ‘भाषाङ्कुर’ची प्रत (नसल्यास)
- चिंतनासाठी ऑनलाईन वर्गात मुक्त प्रवेश
- साप्ताहिक मार्गदर्शन
- ३३ परीक्षा
- गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
लक्षात घ्या की वरील बाबी लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी योग्य तेवढी देणगी देणे अपेक्षित आहे.
‘भाषाङ्कुरः’ ग्रंथाच्या एका अध्यायातील काही भाग आणि शिकण्याची पद्धत पुढील व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगितली आहे.

